हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘ध्येय प्राप्त करण्यासाठी स्वप्न पहा, जर तुम्ही स्वप्ने पाहीली नाहीत तर तुम्हाला आयुष्यात कोणतेही ध्येय असणार नाही आणि ध्येयांशिवाय यश मिळवता येणार नाही’. हे शब्द आहेत देशातील सुप्रसिद्ध बिझनेसमॅन आणि एचसीएल टेकचे संस्थापक शिव नादर यांचे. त्यांनी मोठी घोषणा करत आपल्या कंपनीचे अध्यक्षपद सोडले आहे. आता त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील. मात्र, शिव नादर हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कायम राहतील. त्यांचे पद हे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसरचे असेल.
नादर म्हणाले, आम्ही अशा काळात जगत आहोत जिथे जगभरातील संस्था आणि लोकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मात्र, यामुळे व्यवसायाला चालना अधिक मिळाली आहे, कारण या अवघड कालावधीमुळे व्यवसायातील नवीन बदलांना प्रोत्साहन मिळते. एचसीएल, त्याच्या भागीदारांसह ग्राहकांना सध्याच्या या नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करत आहे कारण आता तेच New Normal आहे.
चला तर मग जाणून घेऊयात 1.70 लाख कोटी रुपयांची कंपनी कशी तयार केली
तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आणि देशातील मोठे उद्योगपती शिव नादर यांचा जन्म 14 जुलै 1945 रोजी झाला होता. आज दक्षिण भारतातील छोट्या खेड्यातून आलेल्या शिव नादर यांच्यामुळे भारताने माहिती तंत्रज्ञान व संगणक विज्ञान क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे. ते तामिळनाडूचे असून हिंदू धर्माचे आहेत. ते एचसीएल टेक्नोलॉजीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. एचसीएल माहिती तंत्रज्ञान सेवेसाठी प्रसिद्ध आहे.
त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पुण्यातून झाली जिथे ते वालचंद ग्रुप ऑफ इंजिनिअरिंगचा एक भाग झाले. व्यवसाय चालवण्याचा काहीस अनुभव मिळाल्यानंतर त्यांनी ते सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपल्या मित्रांच्या आणि इतर बिझनेस पार्टनरांच्या मदतीने ते या देशातील सर्वात मोठी तांत्रिक क्रांती घडवून आणण्यात गुंतले.
खासगी नोकरी सोडून सुरू केली कंपनी
त्यांनी आपल्या पाच मित्रांसह ‘मायक्रोकॉम्प लिमिटेड’ नावाची एक कंपनी सुरू केली. त्यांची कंपनी 1976 मध्ये बनलेला टेलिडीजीटल कॅल्क्युलेटरची विक्री करीत असे.शिव नादर यांनी एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला भेटलेला पहिला व्यक्ती हा अर्जुन होता. तो माझ्यासारखाच मॅनेजमेंट ट्रेनीही होता. आम्ही चांगले मित्र झालो आणि आजपर्यंत आम्ही सांगतच आहोत. यानंतर, आम्ही दोघांनी डीसीएममध्ये काम करणारे आमच्या सारखीच लोकं जोडली आणि एकत्र काम करण्यास सुरवात केली.
लवकरच या कंपनीचे नाव हिंदुस्तान कॉम्प्यूटर्स लिमिटेड (एचसीएल) असे ठेवले गेले आणि संगणक बनविण्यास सुरुवात केली. आणि पाहता पाहता ही भारतीय कंपनी जगभरात नामांकित ब्रँड बनली. 1980 मध्ये, त्यांनी सिंगापूरमध्ये आयटी हार्डवेअरची विक्री करण्यासाठी ‘फोर ईस्ट कॉम्प्यूटर्स’ ची स्थापना करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली ओळख निर्माण केली. पहिल्याच वर्षी त्यांनी सुमारे दहा लाख रुपये मिळवले. यानंतर नादरने मागे वळून पाहिलेच नाही. 1982 मध्ये कंपनीने आपला पहिला पीसी बाजारात दाखल केला. मग आयटी व्यवसायाशी संबंधित पाच कंपन्या त्यांच्या फर्ममध्ये विलीन झाल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.