सरकारने नियम बदलले, आता जर हे डॉक्यूमेंट नसेल तर आपण रिन्यू नाही करू शकणार Motor Insurance

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोटार विमा (Motor Insurance) करणाऱ्यांसाठी ही बातमी जाणून घेणे फार महत्वाचे आहे. खरं तर, विमा नियामक, (Insurance Regulator) IRDAI द्वारा नुकताच एक निर्देश जारी केला गेला आहे, ज्याची तुम्हाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे. IRDAI ने विमा कंपन्यांना Motor Insurance संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याचे सांगितले आहे. IRDAI ने कोणत्या नियमात बदल केला आहे ते जाणून घेउयात.

नव्या नियमानुसार जर वाहन-मालकाचे दिल्ली-NCR मध्ये प्रदूषण नियंत्रण सर्टिफिकेट (Pollution Under Control) नसेल तर त्याच्या इंश्योरेंस रिन्यू केला जाणार नाही. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यासाठी ही बाब उपस्थित केली होती.

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी लक्षणीयरित्या वाढलेली आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून औद्योगिक कार्यक्रम बंद आहेत. अन्यथा दिल्लीची हवा आणखीनच विषारी बनली असती. जुलै 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणासंदर्भात निर्देश जारी केले होते. कोर्टाने विमा कंपन्यांना वाहन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control) मिळत नाही तोपर्यंत वाहन विमा काढू नका असे सांगितले होते.

प्रत्येक वाहन मालकाकडे वैध पीयूसी सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. तरच ते निर्धारित उत्सर्जन मानक पूर्ण करू शकतील. असे सर्टिफिकेट न घेतल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत त्या वाहनांवर कारवाई केली जाऊ शकते.

प्रदूषण पातळी तपासण्यासाठी संगणकीकृत सुविधा बर्‍याच पेट्रोल पंप आणि वर्कशॉप वर उपलब्ध आहे. पीयूसी सर्टिफिकेट देखील येथे दिले जाते. जेव्हा वाहन उत्सर्जनाचे मानदंड पूर्ण करते तेव्हाच सर्टिफिकेट दिले जाते. उत्सर्जन नियमांबाबत सतत कडक धोरण अवलंबिले जात आहे. हे वाहनांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी केले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com