मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

मोदींची भक्ती करणाऱ्या माध्यमांतून महाराष्ट्राचं वास्तव कधी दाखवलं जाणार? – राहुल गांधी

जीएसटी,नोटबंदीचे भयानक परिणाम आजही देश भोगत असून सध्या देश आर्थिक संकटातून जात असताना ज्यांना खरचं मदतीची आवश्यकता आहे, त्यांना मदत करण्याऐवजी धनदांडग्यांना मदत करण्याचं काम सरकार करत असल्याचं राहुल पुढे म्हणाले.

पेट्रोलचे दर पुन्हा भडकण्याची शक्यता

लाल समुद्रातून जाणाऱ्या इराणच्या तेल टँकरवर शुक्रवारी रॉकेट हल्ला करण्यात आला. सौदी अरेबियाच्या किनाऱ्यापासून काही किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. गेल्या काही महिन्यांपासून या भागात इराण आणि अमेरिकेमध्ये मोठया प्रमाणावर तणाव आहे. रॉकेट हल्ल्यामुळे इराण आणि सौदी अरेबियाचे संबंध आणखी बिघडण्याची शक्यता आहे. या हल्ल्यासंबंधी सौदी अरेबियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

‘मोदीजी को भगवान मानते थे…हम डूब गए’; मदतीसाठी रडणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

मोदींच्या कटआउट्चे पाय धरून मदतीची याचना करताना ही महिला, ‘विदेशात जाऊन तुम्ही मदत करता. आमचंही भलं करा. आम्ही तुम्हाला मतं दिली आहेत. भीक मागायची वेळ आली आहे. आमचा पैसा मिळवून द्या.’ असं म्हणत आहे.

देशावर संकट आल्यावर राहुल गांधी इटलीला पळून जातात – योगी आदित्यनाथ; परभणीतही कलम ३७० चा पुनरुच्चार

राज्यात निष्क्रिय झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करताना कलम ३७० रद्द केल्यामुळे आतंकवादी कारवायांना अटकावच होईल असा विश्वास व्यक्त करत मोदी सरकारचं कौतुक योगी आदित्यनाथ यांनी केलं.

‘जिओ’कडील ‘फ्री कॉलिंग’चे दिवस गेले

आउटगोइंग कॉल मोफत देऊन देशातील दूरसंचार उद्योगातील समीकरणे बदलणाऱ्या ‘रिलायन्स जिओ’ने आता त्यासाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेऊन ग्राहकांना धक्का दिला आहे. कॉल टर्मिनेशन शुल्काशी संबंधित नियमांमधील अनिश्चिततेमुळे ‘रिलायन्स जिओ’ आउटगोइंग कॉलसाठी आता ग्राहकांकडून प्रति मिनिट सहा पैसे दराने शुल्कआकारणी करणार आहे. मात्र, आकारलेल्या शुल्काइतकाच डेटा मोफत देऊन त्याची भरपाईही करण्यात येणार असल्याचे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले.

बीएसएनएल, एमटीएनएल बंद होणार?

वाढते कर्ज व घटते उत्पन्न यामुळे अस्तित्वासाठी झगडत असलेल्या बीएसएनएल व एमटीएनएल या दूरसंचार कंपन्या बंद कराव्यात असा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सरकारसमोर मांडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही कंपन्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून ७४ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.

अबब..!! प्रदीप शर्मांच्या पत्नीची मालमत्ता तब्बल २४ कोटी

गेल्या ३५ वर्षांच्या सेवेत जवळपास पावणे दोन कोटींची मालमत्ता जमवल्याची माहिती शर्मा यांनी उमेदवार प्रतिज्ञापत्रात दिली आहे. मात्र, शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती यांची मालमत्ता तब्बल २४ कोटींच्या घरात आहे.

सरकारने दिली केंद्रीय कर्मचाऱ्यांना ‘दिवाळी भेट’; महागाई भत्त्यात केली ५ टक्के वाढ

दिवाळीपूर्वी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिलं आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्क्यांची वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. यानंतर आता सरकारी महागाई कर्मचाऱ्यांचा भत्ता १२ टक्क्यांवरुन १७ टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात बुधवारी (९ऑक्टोबर) झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

सणासुदीच्या मुहूर्ताला यंदा ‘मंदी’चे विघ्न; वस्तू ,प्रॉपर्टी खरेदीबाबत ग्राहकांचा निरुत्साह

अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचे मानक मानल्या जाणाऱ्या आणि खरेदीदारांच्या निर्णय यादीत महत्त्वाचे स्थान पटकावणाऱ्या वाहन, घर आणि सोने खरेदीवरील मंदीचे सावट दसऱ्यातही कायम होते. खरेदीसाठी साडेतीन मुहूर्तापैकी दसरा हा सण महत्त्वपूर्ण म्हणून ओळखला जातो. पण या मुहूर्ताच्या दिवशी अनेकांनी आपल्या खरेदी यादीला मंदीमुळे आखडते घेतल्याचे स्पष्ट झाले.