कोणत्या बँका बचत खात्यांवर 7% पर्यंत व्याज देत आहेत जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बँकांच्या FD आणि बचत खात्यांवरील व्याजदर झपाट्याने कमी झाल्यामुळे लोकं त्यात पैसे ठेवण्यास कचरत आहेत. बहुतांश मोठ्या बँका 5 ते 6 टक्के व्याज देत आहेत. मात्र काही छोट्या फायनान्स बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जास्त व्याजदर देत आहेत.

बँक बाजारने व्याजदराचे सर्वेक्षण करून ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार आम्ही तुम्हाला त्या स्मॉल फायनान्स बँका आणि खाजगी बँकांबद्दल सांगत आहोत ज्या जास्त व्याजदर देत आहेत. मात्र छोट्या बँकांमध्ये खाते उघडण्यापूर्वी तुम्ही अनेक गोष्टी तपासल्या पाहिजेत. जेणेकरून तुमच्या पैशाचे कोणतेही नुकसान होणार नाही.

खाते उघडण्यापूर्वी ‘हे’ डिटेल्स तपासा
नवीन रिटेल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मॉल फायनान्स बँक मोठ्या खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. तुम्ही लॉन्ग टर्म ट्रॅक रेकॉर्ड, चांगले सर्व्हिस स्टँडर्ड्स, मोठे ब्रांच नेटवर्क आणि वेगवेगळ्या शहरांमधील ATM सर्व्हिस असलेली बँक निवडावी, तर चांगला व्याजदर तुमचा बोनस असेल.

AU Small Finance Bank : ही बँक आपल्या बचत खात्यांवर 7 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. यासाठी सरासरी 2,000 ते 5,000 रुपये मंथली बॅलन्स आवश्यक आहे.

Ujjivan Small Finance Bank : ही बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहे.

Equitas Small Finance Bank : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बचत खात्यांवर 7 टक्के व्याज देत आहे. यासाठी 2,500 ते 10,000 रुपये सरासरी मंथली बॅलन्स राखणे आवश्यक आहे.

DCB Bank : DCB बँक बचत खात्यांवर 6.5 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहे. ही बँक खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देत आहे. यामध्ये 2,500 ते 5,000 रुपयांपर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवावा लागेल.

Suryoday Small Finance Bank : ही बँक बचत खात्यांवर 6.25 टक्के व्याज देत आहे. सरासरी मंथली बॅलन्स 2,000 रुपये ठेवणे आवश्यक आहे.

BankBazaar ने 1 डिसेंबर 2021 पर्यंतचा डेटा कम्पाइल केला आहे. ज्या बँकांच्या वेबसाइट्स ही माहिती देत ​​नाहीत त्यांच्या डेटाचा विचार करण्यात आलेला नाही.

Leave a Comment