मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये दिल्ली, कोलकाता आणि बँगलोर या टीमकडून खेळलेला आणि टीम इंडियाच्या अंडर 19 टीमचा माजी सदस्य असलेल्या हरप्रीत सिंह भाटीया या खेळाडूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरप्रीत सिंह (harpreet singh bhatia) हा सध्या छत्तीसगड रणजी क्रिकेट टीमचा प्रमुख सदस्य आहे. रायपूरमधील पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दखल झाला असून त्याच्यावर या प्रकरणी मोठी कारवाई होऊ शकते. हरप्रीत सिंह याच्यावर नोकरी मिळवण्यासाठी बनावट मार्कशीटचा वापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
भारतीय लेखा परीक्षा विभागाने त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी कि, हरप्रीतने 2014 साली क्रिकेटच्या कोट्यातून लेखा परीक्षक, लेखपाल पदासाठी अर्ज केला होता. यावेळी त्याच्याकडून योग्य शैक्षणिक प्रमाणपत्र मागण्यात आले होते. हरप्रीतची (harpreet singh bhatia) या पदासाठी निवड देखील झाली होती. यानंतर कार्यलयाकडून निवड झालेल्या सर्व उमेदवारांच्या शैक्षणकिक योग्यता प्रमाणपत्राची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये हरप्रीतनं सादर केलेली बुंदेलखंड विद्यापीठाची डिग्री बनावट असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
हरप्रीतची क्रिकेट कारकिर्द
हरप्रीत (harpreet singh bhatia) दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या आयपीएल टीमचा सदस्य होता. त्याने 71 टी20 सामन्यात 2006 रन केले आहेत. यामध्ये 15 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 70 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 47.75 च्या सरासरीनं 4489 रन केले असून यामध्ये 14 शतक आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे.
हे पण वाचा :
मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य
राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान
PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन
KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली
Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!