Firing Outside Salman House : सलमानच्या घरावरील हल्ल्याचा कट कॅनडात शिजला?? समोर आले महत्वाचे अपडेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार (Firing Outside Salman House) केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर पोलीस यंत्रणा तातडीने ऍक्शन मोड वर आली असून सर्व बाजूनी तपास सुरु आहे. त्यातच आता या गोळीबार प्रकरणी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सलमान खानच्या घरावर करण्यात आलेल्या गोळीबाराचा कट कॅनडात शिजला आहे, तसेच एक महिन्यापूर्वीच हा कट रचण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

आयपी ॲड्रेस हा कॅनडातील- Firing Outside Salman House

खरं तर सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनंतर, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये घटनेची जबाबदारी स्वीकारली होती आणि सलमान हा तर फक्त ट्रेलर आहे इथून पुढे गोळी घराच्या भिंतीवर झाडणार नाही असा धमकीवजा इशारा सुद्धा दिला होता. मात्र फेसबूक पोस्टचा आयपी ॲड्रेस हा कॅनडातील असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून हा पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच गोळीबार करण्याआधी हल्लेखोरांनी रायगड जिल्ह्यातून जुनी बाईक खरेदी केली होती असे तपासात समोर आले आहे. या गोळीबारानंतर महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, आणि पंजाब या ५ राज्यांच्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार (Firing Outside Salman House) करतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसाना सापडले आहेत तसेच आरोपींचा चेहराही समोर आला आहे. यातील एका आरोपीची ओळख पटली असल्याची माहिती आहे. सलमान खानच्या घरावरील हल्ल्यात विशाल राहुल उर्फ ​​कालूचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. विशाल राहुल उर्फ ​​कालू हा गुरुग्रामचा रहिवासी असल्याचे पोलिसांच्या डॉजियरमध्ये समोर आले आहे. कालूने दहावीपर्यंत शिक्षण घेतले असून त्याच्यावर 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.