हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेबाबतचे संकेत दिले. यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयात पोलिसांसोबत माजी खासदार निलेश राणे यांनी हुज्जड घातली होती. त्यावरून पोलिसांनी निलेश राणे यांच्यासह पाच जणांवर ओरोस पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे.
भाजप आमदार नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान काल कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर काल पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी नितेश राणे यांना घरी घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना थबविले होते. त्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी पोलिसांशी वाद घेतला होता.
दरम्यान, नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा रंगला होता. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना मला कायदा शिकवू नका असेही त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, यावरून जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी 188 आणि 269, 270, तसेच पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी 186 कलमांनुसार सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात पोलिसांच्यावतीने निलेश राणे यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.