हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर तर ठेवीदार, गुंतवणूकदार आणि बँकांनी काळजी करु नका असं आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं होत.
दरम्यान, आता सर्वात मोठी बँक म्हणजेच स्टेट ऑफ इंडिया बँकेने येस बँकेतील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबत उल्लेख केला होता. स्टेट बँकेने या बँकेची हिस्सेदारी खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नवे संचालक मंडळ नेमल्यानंतर बँकेच्या ठेवी आणि देयकांवर कुठलाही परिणाम होणार नाही. पुढील एक वर्षापर्यंत बँकेच्या कर्मचाऱ्यांची नोकरी आणि पगार सुरक्षित राहतील असेही त्यांनी यावेळी म्हटलं होत.
FM Nirmala Sitharaman on #YesBank: RBI has assured that the reconstruction plan will come into play within the moratorium period; SBI has expressed willingness to invest in Yes Bank pic.twitter.com/wY75z16FWZ
— ANI (@ANI) March 6, 2020
रिझव्र्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यामुळे बँकेच्या खातेदारांना महिन्याभरात ५० हजार रुपयांपर्यंतच रक्कम काढता येणार आहे. त्यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी रिझव्र्ह बँकेची विशेष मंजुरी घ्यावी लागेल. अपवादात्मक परिस्थितीत वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नासाठी हे पैसे काढता येतील. या निर्णयामुळे पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेपाठोपाठ (पीएमसी) आर्थिक संकटात असणाऱ्या येस बँकेला घरघर लागल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेकडून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.