पुलवामा हल्ल्याच्या विधानावरून आशिष शेलारांची पवारांवर टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मुंबईमधील सभेत कलम 370 च्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले. त्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही पवारांवर शाब्दिक हल्ला केला आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह दोघेही येऊन जेव्हा जेव्हा प्रचाराची सुरुवात करतात तेव्हा छत्रपतींच्या या महाराष्ट्रातील निवडणुकीत भाजपच्या विजयाचेच झेंडे फडकतात. जाणत्या राजांच्या अफवांप्रमाणे ‘कुछ होवो न होवो’ भाजपचा मुख्यमंत्री पुन्हा होणार हे मात्र ठरले हो”, असे ट्वीट करत आशिष शेलार यांनी पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

दरम्यान जवाहरलाल नेहरु यांच्या चुकीमुळेच पाकव्याप्त काश्मिरचा मुद्दा उभा राहिला असल्याचे सांगाताना शहा म्हणाले, कलम 370 हटवणे हा भाजपसाठी राजकारणाचा विषय नव्हता. राहुल तुम्ही तर आताच राजकारणात आलात आमच्या तीन पिढ्या काश्मिरसाठी बलिदान देण्य़ासाठी पुढे आल्य़ा.