देशमुखांनंतर आता अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार; किरीट सोमय्यांचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर ईडीच्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्यानंतर आता देशमुखांचे दिवानजी पंकज देशमुख यांनाही ताब्यात घेतले आहे. या घटनेवरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दावा केला आहे. देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब व जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे.

भाजपचे माजी खासदार सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, “ईडीने आज परत अनिल देशमुख यांचा परिवार, मालमत्तांवर छापे टाकले. 100 कोटी रोख /मनी ट्रेल सापडला आहे. देशमुख परिवार कडे 1 हजार कोटीची मालमत्ता आहे. काही दिवसात अनिल देशमुख, त्यांच्यानंतर अनिल परब आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई होणार आहे हे निश्चित,” असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई करीत त्यांच्याकडे असलेली ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली आहे. त्यांच्यानंतर आज ईडीच्यावतीने कारवाईची सूत्रे अधिक गतिमान करण्यात आली आहे. देशमुखांच्या काटोल व वडविहराताल या दोन ठिकाणी रविवारी ईडीकडून छापा टाकण्यात आला आहे.

Leave a Comment