मुंबई | ईडीच्या केसमध्ये अखेर 11 महिन्यांनी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. अनिल देशमुख यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. 1 लाख रूपयाच्या जातमुचल्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच पासपोर्टही जमा करण्यास सांगितला आहे. परंतु सीबीआयचा जामीन मिळेपर्यंत कोठडीत रहाव लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
अनिल देशमुख यांना जामीन मिळताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आनंदअश्रू डोळ्यातून आलेले पहायला मिळाले. सचिन वाझे हे वेगवेगळे जबाब देत आहेत. तसेच अनिल देशमुख यांचे वय 73 असून त्यांना वेगवेगळे आजार आहेत. त्यामुळे जामीनाची मागणी केली आहे. आता सीबीआय प्रकरणात त्यांना कोठडीत रहाव लागणार आहे, परंतु आम्ही तेथेही जामीनासाठी अर्ज केला आहे. तसेच 13 तारखेपर्यंत मुंबई कोर्टाच्या निकालावर स्टे देण्यात आला आहे. त्यामुळे आता 13 तारखेला सीबीआयच्या अर्जावर सुनावणी होणार आहे.
सत्यमेव जयते ! : खा. सुप्रिया सुळे
या जामीनावर खा. सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सत्यमेव जयते, असे म्हणाल्या. तसेच नवाब मलिक, संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांचे जावई या सर्वांना जामीन मिळेल.