टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस; राजू शेट्टींची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या विरोधात आक्रमक पावित्रा घेत आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. “जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटील यांना दिसते. मोठ्या योजना आणून टेंडर काढण्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना रस आहे, अशी घणाघाती टीकाही शेट्टी यांनी केली.

पीक नुकसानीचे पंचनामे राज्य सरकारकडून करण्यात दिरंगाई केली जात असल्याने तसेच नुकसानीची भरपाई कमी प्रमाणात देण्यात येत असल्याने या विरोधात आक्रमक पावित्रा घेत आज माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आक्रोश मोर्चा काढला. यावेळी शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. शेट्टी म्हणाले की, पूरग्रस्तांना पॅकेज देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरेंनी केली. पण अजून कसलीही मदत मिळाली नाही. पूरामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. शाळा, कॉलेज सुरु झाले असल्याने फी कशी भरायची? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

महाविकास आघाडीसरकारमधील नेत्यांनी नुकसानीचा दौरा केला आहे. मात्र, त्यांच्याकडून मदत देऊ असे नुसते आश्वासन दिले जात आहे. अद्यापही पूरग्रस्त शेतकऱयांचे पुनर्वसन झालेले नाही. त्यांचे पुनर्वसन करणार आहात की नाही? हे सांगावे. रस्ते करण्यासाठी चौपटीने पैसे देता मग पूरग्रस्तांना पैसे का देत नाही? असा सवाल शेट्टी यांनी मोर्चावेळी विचारला.

You might also like