कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड | थोर स्वातंत्र्य सेनानी दादासाहेब उंडाळकर यांच्या ४७ व्या पुण्यतिथी दिनानिमित 18 फेब्रुवारीस स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा होणार असल्याची माहिती दादासाहेब उंडाळकर स्मारक समितीचे विश्वस्त, जि.प.सदस्य अॅड उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी कराड येथील पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्मारक समितीचे विश्वस्त माजी प्राचार्य गणपतराव कणसे,प्रा.धनाजीराव काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.माहिती देताना, उदयसिंह पाटील म्हणाले,स्व. काका च्या संकल्पनेतून उंडाळे येथे गेली ४५ वर्षे प्रबोधनाचे काम सुरु आहे.दादा उंडाळकर यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी भव्य कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे प्रवर्तक माजी मंत्री स्व. विलासराव पाटील-उंडाळकर यांचे मागील महिन्यात निधनझाले आहे. या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी स्वातंत्र्यसेनानी दादाउंडाळकर यांच्या 47 व्या पुण्यतिथीनिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी 38 वे स्वातंत्र्य संग्राम अधिवेशन, माजी सैनिक मेळावा व सन्मानिका प्रकाशन करण्यातयेणार आहे.
कार्यक्रमाची माहिती देताना माजी प्राचार्य गणपतराव कणसे म्हणाले,उंडाळे (ता. कराड) येथे या कार्यक्रमाची तयारी सुरू करण्यात आली असून जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होत आहे. या वर्षी होणाऱ्या या कार्यक्रमास प्रबोधन प्रकाशन इचलकरंजीचे संपादक प्रसाद कुलकर्णी व दिव्य मराठी औरंगाबादचे संपादक संजय आवटे हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास स्व.विलासराव पाटील (काका) यांच्या प्रयत्नातून देशातील महान विभूती येऊन आपले विचार व्यक्त केले आहेत. सदर कार्यक्रमास राज्यातील माजी सैनिक, स्वातंत्र्य सैनिकांना निमंत्रित केले असून ग्रामस्थ व विभागातील जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन अँड उदयसिंह पाटील यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’