अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका! निलेश राणेंचा शिवसेनेला टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांत सिंग राजपूत केसमध्ये AIIMS अहवालात सुशांतने आत्महत्यांचं केल्याचं म्हटलं आहे. AIIMS डॉक्टरांच्या टीमने सुशांतने आत्महत्या केल्याचा अहवाल सीबीआयला सुपूर्द केला आहे. AIIMS च्या या अहवालानंतर सुशांत प्रकरणावरून टीका करणाऱ्या विरोधकांवर शिवसेना निशाणा साधत आहे. दरम्यान, शिवनेनेला सुशांत प्रकरणावर सतत लक्ष करणाऱ्या निलेश राणे यांनी अजून CBIचा रिपोर्ट बाकी, आतापासूनच डीजे वाजवू नका असा टोला शिवसेनेला मारला आहे.

ट्विटर निलेश राणे म्हणाले कि, ”SSR केसच्या AIIMS अहवाला नंतर शिवसेना उड्या मारायला लागली, त्यांना वाटतं की केसचा निकाल लागला. बॉडी नसल्यामुळे फक्त उरल्यासुरल्या गोष्टींवर अहवाल द्यावा लागला. सीबीआयचा रिपोर्ट अजून बाकी आहे. अजून खूप काय बाकी आहे एवढ्या लवकर डीजे वाजऊ नका.” दरम्यान निलेश राणे यांच्या टीकेनंतर शिवसेना काय उत्तर देते लक्ष यावर लागून आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येनंच झाल्याचा अहवाल AIIMSनं दिल्यानंतर आता शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावरून ज्यांनी मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर टीका केली, तसेच महाराष्ट्राची बदनामी केली, ते आता माफी मागणार का? असा सवाल शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून विचारण्यात आला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment