टीकाकारांची बोलती बंद करण्यासाठी संजय राऊतांनी शेअर केला अजय देवगणचा ‘तो’ व्हिडिओ

मुंबई  । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल वापरलेल्या ‘हरामखोर’ या शब्दावरून गदारोळ सुरू आहे. मुंबई व मुंबई पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतरही आव्हानाची भाषा करणाऱ्या कंगनाला संजय राऊत हे ‘हरामखोर’ म्हणाले होते. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर राऊत यांनी खुलासा केला. मला ‘बेईमान’ व ‘नॉटी गर्ल’ असं म्हणायचं होतं, असं ते म्हणाले. राऊत यांच्या या खुलाशावरून भाजपचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. या टीकाकारांना उत्तर म्हणून आता राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवरून अभिनेता अजय देवगणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अजय देवगण ‘रास्कल’ या आपल्या एका चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल बोलताना दिसतोय. इंग्रजीत सर्रास वापरल्या जाणाऱ्या ‘रास्कल’ या शब्दाबद्दल स्पष्टीकरण देताना दिसतोय. ‘काही लोकांना वाटतं ‘रास्कल’ हा वाईट शब्द आहे. मात्र, शाळेत आम्ही खोड्या केल्या की शिक्षकही आम्हाला ‘रास्कल’ म्हणायचे. ‘नॉटी’ मुलांना रास्कल वगैरे म्हटलं जातं,’ असं अजय देवगण या व्हिडिओ सांगताना दिसतोय. ‘हरामखोर’ हा शब्दही मला त्याच अर्थानं वापरायचा होता, असं राऊत यांनी या माध्यमातून पुन्हा एकदा सुचवलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या ला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook