नागपूरला सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला असता हि माहिती दिली आहे. पाटील म्हणाले की आमचं सरकार हे काही चौकशी सरकार नाहीं. परंतु जे कॅग ने म्हटले आहे त्याची दखल घ्यावीच लागणार आहे. कारण जे रेकॉर्डवर दिसत आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
दरम्यान, अजित पवारांना मिळालेल्या क्लीनचिट वर बोलताना पाटील म्हणले, फडणवीसांनी अजित पवारांबरोबर जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला कारण वट्याना माहित होत अजित पवार निर्दोष आहेत. भाजपने ५ वर्षे खोटे आरोप केले असल्याचे सांगत भाजपवर निशाणा साधला आहे.