राष्ट्रवादीला मोठा धक्का! अजित पवार यांनी मंजूर केलेला निधी शिंदे, फडणवीस सरकारने रोखला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका सुरू केला आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर शिंदे, फडणवीस सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या काळात विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आलेला 850 कोटी रुपयांचा निधी (fund sanctioned) शिंदे – फडणवीस सरकारकडून रोखण्यात आला आहे अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली आहे. यावरून आता पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

पवार, मुश्रीफ यांना धक्का
शिंदे, फडणवीस सरकारने विविध विकास कामांसाठी असलेला 850 कोटी रुपयांचा निधी (fund sanctioned) रोखला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी तसेच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

विरोधक आक्रमक होण्याची शक्यता
सत्तेत आल्यापासून फडणवीस, शिंदे सरकारकडून महाविकास आघाडीच्या काळातील योजनांना स्थगिती देण्याचा धडाका सुरु करण्यात आला आहे. विरोधकांनी यावरून अनेकदा सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यामध्ये आता 850 कोटी रुपयांचा निधी (fund sanctioned) रोखल्याने राष्ट्रवादीसह अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!