भावी मुख्यमंत्री राज ठाकरे!! शिवसेना भवनासमोरच मनसेची बॅनरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा होणार आहे. आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार? मनसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं आहे. तत्पूर्वीच मुंबईत मुंबईतील दादर परिसरात भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आले आहेत . त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.

दादरमधील शिवसेना भवनासमोर हे मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, हिंदू जननायक राज ठाकरे असा उल्लेख बॅनर्सवर करण्यात आला आहे. या बॅनर वर भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा भलामोठा फोटो दिसत आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीला अवघ वर्ष राहील आहे, अशावेळी मनसे राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर करून मास्टर कार्ड खेळणार का? याकडे लक्ष्य लागलं आहे.

दरम्यान, आजच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय बोलणार? मनसैनिकांना मार्गदर्शन करताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय भाष्य करणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष्य असेल. गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत त्यांची भूमिका अनुकूल वाटत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसवरच राज ठाकरेंची तोफ धडाडण्याची शक्यता अधिक आहे.