मुख्यमंत्र्यांची औरंगाबादची सभा म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ चा प्रयोग ; मनसेची घणाघाती टीका

0
106
Gajanan Kale Uddhav Thackeray
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल बुधवारी औरंगाबादमध्ये महाविराट सभा पार पडली. या सभेत मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेतून मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. “उद्धव ठाकरे यांची कालची सभा म्हणजे चला हवा येउद्याचा प्रयोग म्हणावा लागेल, अशी टीका मनसेचे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत केली आहे.

कालच्या मुख्यमंत्र्याच्या सभेनंतर गजानन काळे यांनी आज ट्विट करत निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एक तास भाषण केले. या भाषणात त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. आम्हाला शंका होती कि त्यांच्या या वेळच्या टोमणे सभेच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीवरुन नाही तर अबु आझमीकडून आली होती. 3 दशकांपासून सेनेचा महापौर,आमदार,खासदार असूनही ना पाणी प्रश्न सोडवता आला ना औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करता आले.

एक म्हण आहे कि “काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पिंज-यात वाघ सापडे,हिंदू व मराठी जनता मारती खडे” अशी अवस्था आज शिवसेनेची झाली आहे. शेवटी कालच्या मुख्यमंत्र्याच्या सभेतील प्रयोग म्हणजे चला हवा येऊ द्याचा प्रयोग म्हणावा काजळ, असा टोला देखील काळे यांनी ट्विटच्या माध्यमातून लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here