मुंबई : हॅलो महाराष्ट्र – खासदार गजानन किर्तीकर यांनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या या प्रवेशावरून काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. किर्तीकर यांचा हा पक्षप्रवेश म्हणजे मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातील मतदारांना दिलेला धोका असल्याचे ते म्हणाले. तसंच किर्तीकर राजीनामा देत नाहीत तो पर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही असा इशाराच संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी दिला आहे.
काय म्हणाले संजय निरुपम
उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांचा होता, त्यावर मला काही बोलायचं नाही. त्यांनी का आणि कोणत्या अमिषाला बळी पडून पक्ष सोडला यातही मला जायचं नाही. पण माझं असं मत आहे की, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून तुम्ही निवडणूक लढवली होती, धनुष्य-बाण चिन्हावर तुम्ही निवडून आला होता. आता जेव्हा तुम्ही पक्ष सोडला आहे, त्यामुळे तुम्हाला आता संसद सदस्य म्हणूनही राजीनामा द्यायला हवा आणि ही गद्दारी असल्याचे संजय निरूपम (Sanjay Nirupam) म्हणाले आहेत.
तसेच ज्या पक्षाने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, मतदारांनी तुम्हाला जास्तीत जास्त मत देऊन निवडून आणले आहे. त्यांच्याशी तुम्ही विश्वासघात केला अशी टीकादेखील संजय निरुपम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर केली आहे. तुम्हाला जास्त मत मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला आणि कमी मिळाली त्यामुळे मी पराभूत झालो त्यामुळे तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, अशी मागणी संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्याकडून करण्यात आली आहे.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!