कल्याण : हॅलो महाराष्ट्र – एसआयटीने राज्यात एक मोठी कारवाई केली आहे. बांधकाम व्यावसायिकांना खोटे रेरा प्रमाणपत्र (fake maharera certificates) देणाऱ्या टोळीला एसआयटीने कारवाई करून अटक केली आहे. यामध्ये एका महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने या आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियंका रावराणे मयेकर, प्रवीण ताम्हणकर, राहुल नवसागरे, जयदीप त्रिभुवन, कैलास गावडे अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
वास्तू विशारद संदिप पाटील यांनी उघड केला घोटाळा
कल्याण डोंबिवली महापालिकेकडून खोट्या सही शिक्क्याच्या (fake maharera certificates) आधारे बांधकाम परवानगी असल्याचे भासवून काही बिल्डरांनी रेरा प्राधिकरणाकडून बांधकाम प्रकल्पांचे प्रमाणपत्र मिळवले होते. या प्रकरणी वास्तू विशारद संदीप पाटील यांनी हि बाब माहिती अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणली होती.
65 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल
महापलिकेने या प्रकरणात डोंबिवली रामनगर आणि मानपाडा पोलीस ठाण्यात कल्याण ग्रामीणमधील तब्बल 65 बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कल्याण न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या एसआयटी टीम ही कागदपत्रे (fake maharera certificates) कुठे आणि कशी बनवली? त्यांचे आणखी किती साथीदार आहेत? याचा सविस्तर तपास करत आहेत.
हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी