धक्कादायक ! बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील हरदोई या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर ती एकटी असल्याचा गैरफायदा घेत तसेच तिला बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पाचही आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणातील पाच आरोपींपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर बाकी आरोपींचा शोध चालू आहे. या प्रकरणातील दोषींवर अधिक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हि घटना उत्तर प्रदेशच्या हरदोईच्या सांडी परिसरातील खेडेगावामध्ये घडली आहे. १५ जून रोजी घरातील सर्व लोक एका नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नासाठी गेले होते. त्यावेळी घरी बहीण एकटी होती. वडील रोडवेज बस चालक असल्याने ते बाहेर गावी होते. या घटनेच्या वेळी त्याची बहीण घरी एकटीच झोपली होती. या संधीचा फायदा घेऊन गावातील पाच मुले जबरदस्तीने घरात घुसली आणि त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून बहिणीला शेतात नेवून तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला. अशी माहिती पीडितेच्या भावाने दिली आहे.

घरातले सर्वजण लग्नाच्या कार्यक्रमातून परत आल्यानंतर पीडित मुलीने घडलेली सगळी आपबिती सांगितली. या आरोपींनी हे कृत्य केल्यानंतर मुलीला याबाबत कोणाला सांगितल्यास तिच्यासह कुटुंबातील सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली यामुळे मुलगी खूप घाबरली. पोलिसांकडे तक्रार केल्यास सर्वांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याचे पीडितेच्या भावाने सांगितले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेतील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून बाकी लोकांचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अनिल कुमार यादव यांनी दिली आहे.

Leave a Comment