गांगुलीची नेतृत्व क्षमता स्वाभाविक होती: श्रीकांत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे अध्यक्ष कृष्णामाचारी श्रीकांत यांनी म्हटले आहे की, सध्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यातली नेतृत्व क्षमता ही स्वाभाविकच आहे.

१९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य असलेलं श्रीकांत स्टार स्पोर्ट्स १ चा तामिळ कार्यक्रम’क्रिकेट कनेक्टेड अट्टम थोडारम’ मध्ये म्हणाले, “गांगुली खूप अ‍ॅक्टिव्ह होता. त्याच्यात संघाला जोडण्याची क्षमता होती. सन १९७६ प्रमाणे क्लाईव्ह लॉयडने वेस्ट इंडिज संघ जसा बनविला तसे जिंकण्याचे संयोजन याने तयार केले होते. सौरभने एक संतुलित संघ तयार केला आणि नंतर त्याला जिंकण्याची प्रेरणा दिली.

श्रीकांत म्हणाले, “म्हणूनच गांगुली परदेशी भूमीवरही एक यशस्वी कर्णधार ठरला होता. त्याने परदेशात मॅचेस जिंकण्यास सुरुवात केली. तो स्वभावतःच नेता होता.”

कपिल देवने १९८३ मध्ये पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला होता, ज्यामुळे अनेक क्रिकेटपटूंनाच नाही तर अनेक कर्णधारांनाही प्रेरणा दिली. त्यानंतर २००३ मध्ये गांगुलीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.