हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल २०२० मध्ये काल झालेल्या एलिमिनेटर लढतीत सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दणदणीत पराभव केला. त्यामुळे यावर्षी तरी आयपीएल जिंकायचीच अशी आशा बाळगलेल्या आरसीबीच्या नशिबी पुन्हा एकदा अपयश आले. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या आरसीबीला स्पर्धेच्या उत्तरार्धात उतरती कळा लागली. कसाबसा प्लेऑफसाठी पात्र ठरलेला विराटच्या नेतृत्वाखालील हा संघ एलिमिनेटर लढतीत पराभूत होऊन स्पर्धेतून बाद झाला. या पराभवानंतर विराट कोहलीचे नेतृत्व आणि आरसीबीच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले आहे.
या पराभवाबाबत गंभीर म्हणाला की, तुम्ही विराटच्या संघाचा कितीही बचाव केला तरी माझ्या मतानुसार आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये जाण्याच्या योग्यतेचा नव्हता. हा संघ फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर अपयशी ठरला. गोलंदाजांनी थोडीफार चांगली कामगिरी केली. जर नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराजसारखे गोलंदाज शेवटची दोन षटके टाकत असतील आणि तुम्हाला १८-१९ धावांचा बचाव करायचा असेल तेसुद्धा जागतिक दर्जाच्या फलंदाजासमोर तर ते कठीण आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघामधील अडचणी ह्या सपोर्ट स्टाफ, मॅनेजमेंट आणि लीडरशिपपासून आहेत. जोपर्यंत पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार धरले जाणार नाही तोपर्यंत असेच होत राहणार आहे. या संघाचा प्रशिक्षक दरवर्षी बदलला जातो. मात्र खरं दुखणं दुसरीकडेच आहे, असेही गंभीर म्हणाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’