आता लढाऊ विमानांचे इंजिन भारतातच तयार होणार; GE Aerospace ची HAL सोबत मोठी डील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर असून याच दरम्यान भारत आणि अमेरिका दरम्यान एक मोठा करार झाला आहे. अमेरिकेची जीई एरोस्पेस (GE Aerospace) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात हा करार झाला आहे. या कराराअंतर्गत जीई एरोस्पेस आता एचएएलच्या सहकार्याने भारतीय हवाई दलासाठी (IAF) लढाऊ जेट इंजिन बनवेल. जनरल इलेक्ट्रिकच्या एरोस्पेस युनिटने याबाबत माहिती दिली आहे. या करारामध्ये GE एरोस्पेसच्या F414 इंजिनांच्या भारतातील संभाव्य संयुक्त उत्पादनाचा समावेश आहे.

GE एरोस्पेसचे CEO एच लॉरेन्स कल्प जूनियर यांनी या करारानंतर म्हंटल कि, ,भारत आणि HAL सोबतच्या आमच्या दीर्घकालीन भागीदारीमुळे हा एक ऐतिहासिक करार शक्य झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील जवळचा समन्वय वाढवण्यात जी भूमिका बजावली आहे त्याचा आम्हाला अतिशय अभिमान आहे. GE चे F414 इंजिन अतिशय फायदेशीर असून दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा फायदे देईल.

दरम्यान, त्यापूर्वीच पंतप्रधान मोदींनी GE च्या लॉरेन्स कल्प ज्युनियर यांची भेट घेतली. या भेटीत भारतातील उत्पादनाला चालना देण्यासाठी GE च्या अधिक तंत्रज्ञानाच्या सहकार्यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आलं. भारतीय पंतप्रधान कार्यालयाकडून याबाबत ट्विट करण्यात आलंय. पंतप्रधान मोदींनी कंपनीला भारतातील विमान वाहतूक आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यासाठी आमंत्रित केले आहे. एकूणच मोदींचा अमेरिका दौरा सुरक्षेच्या दृष्टीने फायदेशीर झाला असं म्हंटल तरी हरकत नाही.