हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू या साथीच्या पार्श्वभूमीवर,कालपासून जर्मन फुटबॉल लीगची सुरुवात झाली. यामध्ये खेळविण्यात आलेली लढत हि जर्मनीच्या रिकाम्या स्टेडियममध्ये झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये पूर्णपणे वेगळेच दृश्य पहायला मिळाले.
कोरोना साथीच्या आजारामुळे जगभरातील सर्व खेळ स्थगित करण्यात आलेले आहेत. परंतु खेळ पुन्हा सुरु करण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू होती. मात्र काल, जर्मनीमधील जर्मन फुटबॉल लीग ही रिकाम्या स्टेडियममध्ये सुरू झाली. जेव्हा ही लीग सुरू झाली तेव्हा स्टेडियममध्ये वेगळेच दृश्य होते. ना तिथे प्रेक्षकांचा ओरडण्याचा आवाज आला ना कुठले बँड बाज्याचा. ऐकू येत होता तो फक्त खेळाडूंचा आणि रेफरीच्या शिट्ट्यांचा आवाज.
कोरोना महामारीच्या दरम्यान सुरू होणारी ही पहिलीच युरोपियन लीग आहे. या सामन्यात बरुसिया डार्टमंडचा सामना स्थानिक प्रतिस्पर्धी ‘शल्के ०४’ ने केला. साधारण दिवसात ही लीग पाहण्यासाठी जवळपास ८२,००० लोक येत असत. परंतु यावेळी असा आदेश देण्यात आला आहे की फक्त दोन्ही संघांचे खेळाडू, त्यांचे सपोर्ट स्टाफ, मीडिया कर्मचारी आणि काही अधिकारी एकत्रितपणे मिळून ३२२ लोकांपेक्षा जास्त नसावेत.
इतर दिवसांमध्ये जेव्हा एखादा गोल केलला जातो किंवा एखादा संघ जिंकतो तेव्हा सहसा खेळाडू मिठी मारून किंवा एकमेंकांशी हात मिळवून आनंद साजरा करत असत,मात्र या सामन्यात आनंद साजरा करण्याची पध्द्त पूर्णपणे वेगळी होती. खेळाडू फक्त एकमेकांना टक्कर देऊन सेलिब्रेट करत होते. या लीग दरम्यान खाली बसलेल्या खेळाडूंनी मास्क घातलेले होते. कोविड १९ मुळे सर्व खेळाडूंची आवश्यक खबरदारी घेत चाचणी घेण्यात आली होती. त्यानंतर, प्रत्येकाला स्वतंत्र राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सोशल डिस्टंसिंगमुळे सपोर्ट स्टाफ तसेच खेळाडू हा वेगवेगळ्या बसेसमध्ये आले.
या सामन्यात बरुसिया डार्टमंडने शॅल्के क्लबला ४-० ने मात दिली, सामना सुरू झाल्यापासून बरुसिया डार्टमंडच्या संघावर विरोधी संघाने पूर्णपणे वर्चस्व राखले होते. या विजयानंतर डार्टमंड आता बायर्न म्यूनिचपेक्षा एक गुण मागे आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.