एका ऑफर अंतर्गत साडेचार लाखांची कार मिळवा दोन लाखामध्ये !

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | चांगली कार विकत घेण्यासाठी चार ते पाच लाख रुपये लागतात. यामुळे बऱ्याच मध्यमवर्गीय लोकांना कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बराच कालावधी लागतो. आणि त्यामध्ये मोठ्या अडचणी येतात. तुम्हालाही तुमच्या कमी बजेटमुळे कार खरेदी करण्यामध्ये अडचणी येत असेल तर, काळजी करू नका. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये कमी किमतीत खरेदी करू शकाल अशा ऑफर बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या ऑफरबद्दल.

मारुती सुझुकी या देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीने एक सुविधा सुरू केली आहे. यामध्ये सेकंड हॅन्ड कार तुम्ही खरेदी करू शकता. ‘मारुती सुझुकी ट्रू व्हॅल्यू’ असे या सुविधेचा नाव आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुमची आवडती कार खरेदी करू शकता. मारुतीच्या सर्व सेकंड हॅन्ड गाड्या यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच, अधिकृत विक्रेत्याकडून त्या ग्राहकांना विकल्या जात आहे. कागदपत्रे सर्वकाही तयार असतात. यामुळे वाहनांची मालकी बदलण्यासाठीही काहीच अडचण येत नाही.

मारुती सुझुकीची अल्टो 800 ही एक प्रसिद्ध गाडी आहे. ही सेकंड हॅन्ड गाडी या http://www.marutisuzukitruevalue.com वेबसाईटवरती 2.15 लाखांमध्ये उपलब्ध आहे. या कारची ऑनरोड किंमत (इतर खर्च वगळता) 4.14 लाख पेक्षा जास्त आहे. ही कार ‘टू व्हॅल्यू सर्टिफाइड’ आहे. तसेच ओरिजनल पार्टचा वापर करून रिफर्बिष करण्यात आली आहे. मारुती सुझुकी कडून सहा महिन्याची वॉरंटी आणि तीन सर्व्हिसेस मोफत देण्याची सुविधा देखील दिली गेली आहे. यामुळे एका मध्यमवर्गीय खरेदीदारास ही आनंददायक बातमी ठरत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.