हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । LIC च्या पॉलिसीधारकांसाठी ही बातमी खूपच महत्वाची आहे. आता एलआयसीकडून WhatsApp सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे, आता पॉलिसीधारकांना एलआयसीच्या ऑफीसमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. कारण आता पॉलिसीधारकांची सर्व कामे व्हॉट्सअॅपद्वारेच केली जातील. या सुविधेद्वारे, आता एलआयसीचे पॉलिसीधारक काही खास सेवांचा लाभ घेऊ शकतील. मात्र, ज्या पॉलिसीधारकांनी आपली पॉलिसी एलआयसी पोर्टलवर रजिस्ट्रेशन केली आहे त्यांना ही सुविधा आधीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र, ज्या एलआयसी पॉलिसीधारकांनी आपल्या पॉलिसीचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले नाही. त्यांना यासाठी एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पॉलिसीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी एलआयसीकडे रजिस्टर्ड असलेल्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवावा लागेल. एलआयसीच्या अधिकृत 8976862090 या मोबाईल क्रमांकावर “Hi” असे पाठवावे लागेल. याद्वारे ग्राहकांना पॉलिसी सेवांशी संबंधित माहिती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
व्हॉट्सअॅप सर्व्हिस सुरु करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
सर्वात आधी आपल्या मोबाईल फोनमध्ये 8976862090 नंबर ‘Save’ करावा लागेल.
LIC चा हा अधिकृत WhatsApp नंबर आहे.
हा नंबर ‘Save’ केल्यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये या क्रमांकाने चॅट बॉक्स उघडावा लागेल.
चॅट बॉक्स उघडल्यानंतर ‘Hi’ असे लिहून पाठवावे लागेल.
‘Hi’ लिहून पाठवताच LIC च्या चॅट बॉक्समध्ये 11 पर्याय मिळतील.
फक्त या पर्यायांमधून सेवेबाबतची माहिती हवी आहे.
त्यापुढे दिसणारा पर्याय क्रमांक लिहून पाठवावा लागतो.
WhatsApp Services वर मिळणार ‘ही’ सुविधा
1. प्रीमियम ड्यू
2. बोनस इन्फॉर्मेशन
3. पॉलिसी स्टेटस
4. लोन एलिजिबिलिटी क्वोटेशन
5. लोन रिपेमेंट क्वोटेशन
6. लोन इंटरेस्ट ड्यू
7. प्रीमियम पेड सर्टिफिकेट
8. ULIP यूनिट्स का स्टेटमेंट
9. LIC सर्व्हिस लिंक्स
10.Opt In/Opt Out सर्व्हिस
11. End Conversation
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://licindia.in/
हे पण वाचा :
CIBIL Score म्हणजे काय ??? याचा कर्जाच्या पात्रतेवर कसा परिणाम होतो ते समजून घ्या
HDFC कडून होम लोनवरील व्याज दरात वाढ, आता ग्राहकांना द्यावा लागणार जास्त EMI
Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत मिळवा अनलिमिटेड कॉलिंग अन् डेटा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींत वाढ, जाणून घ्या आजचा नवीन भाव
Ayushman Bharat Yojana : केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळवा 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, अशा प्रकारे तपासा पात्रता