केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा; मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनाचा धोका आता संपला अशी शक्यता असतानाच नवीन घातक व्हेरिएंट समोर आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने यंत्रणेला सज्ज राहण्यास सूचना केली आहे. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक घेतली असून ‘कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील’ असं स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोविड विषयक बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या नव्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसंच, राज्यातील संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.

कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा, केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला दिले आहे.

मागील दोन वर्षात कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला होता. पण, आता लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारने आधीच केंद्र सरकारला दक्षिण आफ्रिकेसह इतर देशातून येणाऱ्या प्रवाशी विमानांची वाहतूक थांबावावी किंवा योग्य ती उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.

विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे देखील निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहे. कोरोनासाठी राज्य सरकारची संपूर्ण नवी नियमावली दरम्यान, राज्य सरकारची यंत्रण सतर्क झाली आहे. त्यामुळे कोविडचे नियम पाळण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे. जर कुणी कोरोनाची नियमावली भंग केली तर दंड भरावा लागणार आहे.

Leave a Comment