हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या प्रेमप्रकरणाची (Relationship) प्रकरणे वाढली आहेत. खरं तर प्रेम आंधळं असत असं म्हणतात, परंतु कधी कधी काही गैसमजातुन किंवा भांडणातून ब्रेक अप सुद्धा होते. प्रत्येक वेळी चूक ही मुलांचीच असते असं नाही. काही वेळा चांगल्या मुलांनाही खोटया आरोपामुळे अडचणींना सामोरं जावं लागत. काही वेळा मुली (girl) गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, मुलाला (boy)अडचणीत आणण्यासाठी रेप सारखे आरोप सुद्धा केले जातात. जर तुमच्याही प्रेयसीने तुमच्यावर रेपचा खोटा आरोप केला असेल तर नेमकं काय करावं असा प्रश्न समोर येतो. आज आम्ही त्याबाबतच कायदेशीर (law Advice) माहिती देणार आहोत.
जर तुमच्या गर्लफ्रेंडने तुमच्या विरोधात बलात्काराची खोटी केस केली आणि पोलीस स्टेशनमधून तुम्हाला फोन आला तर तुम्ही एकटं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन नका. अशावेळी आधी ही माहिती काढा की तुमच्या विरोधात FIR दाखल झाला आहे की नाही? जर पोलिसांनी FIR दाखल केला असेल तर कोर्टाची परवानगी न घेता तुम्हाला अटक करण्याचा अधिकार त्यांना असतो, कोणत्यातरी माहितीगार माणसाला पाठवावे.
आपल्याकडे गर्लफ्रेंड (girlfriend) सोबतचे जे काही चॅटिंग असेल, फोटो किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग असतील या सर्वांचे बॅकअप स्वतःजवळ ठेवा. कारण अशा प्रकरणात पोलीस तुमचा मोबाईल ताब्यात घेण्याची शक्यता असते. त्यामुळे हा बॅकअप डेटा तुम्हाला उपयोगी पडू शकतो.
तुमच्याकडे जे काही पुरावे असतील त्याआधारे तुम्ही सेशन कोर्टात जमीन अर्ज करू शकता आणि जर आपण सिद्ध करू शकला कि तुमच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल केला आहे तर तुम्हाला कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मिळू शकतो.
यांनतर जेव्हा चौकशी सुरु होईल तेव्हा तुमच्याविरोधात अधिकाऱ्यांनी कोणकोणते पुरावे गोळा केले आहेत याची माहिती तुम्हाला मिळू शकते . त्यांनतर तुम्ही हायकोर्टात कलम ४८२ सीआरपीसी आणि कलम २२६ अंतर्गत याचिका दाखल करू शकता. परंतु यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा कि एफआयआर उलटप्रश्न करण्यापेक्षा अटकपूर्व जामीन (Anticipatory bail) मिळवण्यासाठी तुम्हाला घाई करावी लागेल.