नवी दिल्ली । म्यानमारचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एक मुलगी एरोबिक्स करताना दिसत आहे आणि तिच्या मागे मोठी लष्करी दल तैनात होताना दिसून येते आहे. हा व्हिडिओ सोमवारचा आहे जेव्हा म्यानमारमधील सैन्याने सत्ता उलथून टाकली आणि नेते आंग सॅन सू की यांना ताब्यात घेतले.
खिंग ह्निन वाईने सोमवारी एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये ती एरोबिक्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक सैन्याची वाहने संसदेच्या दिशेने जाताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जेव्हा सैन्य संसद ताब्यात घेणार होता तेव्हाचा आहे. पाठीमागे सैन्याची वाहने आहेत हे देखील या मुलीला समजले नाही.
Vibe check: A woman doing a live aerobics class in #Myanmar this morning, apparently unaware of the ongoing coup. Military vehicles arrive behind her to seize the parliament building. pic.twitter.com/eZX2w2A4AE
— Jake Hanrahan (@Jake_Hanrahan) February 1, 2021
हा व्हिडिओ त्वरित सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. एका ट्विटर युझरने व्हिडिओ बाबत लिहिले आहे की,”ही एक क्रांतिकारक कसरत आहे. या व्हिडिओच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकत नाही कारण यापूर्वीच हा व्हिडिओ त्याच ठिकाणी वर्कआउट करताना या मुलीच्या फेसबुक प्रोफाइलवर पोस्ट केला गेला आहे.”
सोमवारी म्यानमारमध्ये परिस्थिती आणखी बिकट झाली जेव्हा देशाच्या सैन्याने लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारची सत्ता उलथून टाकली आणि स्वत: च्या हातात सत्ता घेतली आणि एका वर्षासाठी देशात आणीबाणी जाहीर केली. वृत्तानुसार, ऑंग सॅन सू ची आणि अन्य महत्वाच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.