सांगली : हॅलो महाराष्ट्र – सांगली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये सोन्याची अंगठी मागितली म्हणून एका प्रियकराने प्रेयसीचा गळा आवळून तिची हत्या (Murder) केली आहे. या प्रकरणी कडेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
काय घडले नेमके ?
ताई सचिन निकम असे या मृत महिलेचे नाव आहे. तर राहुल सर्जेराव पवार असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. राहुल पवार याने ओढणीने गळा आवळून ताई निकम या महिलेचा खून (Murder) केला. आणि मृतदेह कडेगाव येथील भिवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात फेकून दिला. 6 जून भिकवडी खुर्द गावाचे हद्दीत येरळा नदी पात्रात पुलाजवळ एक मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळून आला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा (Murder) पंचनामा केला.
या महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्यामुळे पोस्टमार्टम जागीच करण्यात आले. कडेगाव पोलिसांनी विटा पोलीस स्टेशनमध्ये 2022 चे मिसिंग रजिस्टरची पाहणी करुन बेवारस मयताचे वर्णनाचे मिळते जुळते वर्णनाचे मिसिंगबाबत माहिती घेतली. तेव्हा बेपत्ता ताई सचिन निकम ही खानापूर येथील बलवडी येथील असल्याचे स्पष्ट झाले. तर नोतवाईक यांनी प्रेताचे अंगावरील कपडे आणि पैंजन ओळखले. त्यानंतर मृत महिलेचा पती आणि नातेवाईकाकडे चौकशी करुन अधिक माहिती घेतली असता मृत ताई निकम ही भाडयाने विटा येथे राहत होती. तिथे ती एका हॉटेलमध्ये काम करत होती.
काय आहे प्रकरण ?
या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता विटा येथील रेणुका ज्वेलर्स मालक राहुल पवार याचे मयत ताई सचिन निकम हिच्याशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्या दोघांचे फोन रेकॉर्ड तपासले असता ताई निकम आणि राहुल पवार यांचे एकमेकांना भरपुर कॉल झालेचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी राहुल पवार याला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सुमारे दीड वर्षांपासून ताई निकम हिच्याशी प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. तिने 3 जून रोजी दुकानात वाढदिवासाकरीता एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली. ती न दिल्याच्या कारणावरुन तिने प्रेम संबंधाबाबत त्यांच्या वडिलांना सांगेन असा दम दिला. याचा राग आल्याने आरोपी राहूल पवार याने ताई निकम हिचा गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून (Murder) केला. त्यानंतर तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदीपात्रात फेकून दिला होता. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राहुलवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
आदित्यजी लवकर तुमचे शुभमंगल होवो आणि सीतामाईसारखी सूनबाई आम्हाला मिळो; भाजप नेत्याने दिल्या शुभेच्छा
SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा
LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ???
ठाकरे सरकार टक्केवारी, वसुलीमध्ये खूश पण आम्ही झोपू देणार नाही…; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
कुत्ते की मौत मरेगा; मोदींवर टीका करताना काँग्रेस नेत्याची जीभ घसरली