अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या; भाजप नेत्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. याचवरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांनी आपला कारभार अजित पवार यांच्या कडे द्यावा अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचे हा सेनेचा अंतर्गत विषय असला तरी अजित पवार यांचा अनुभव पाहता तसेच ते उपमुख्यमंत्री आहेत पाहता टेक्निकली मुख्यमंत्रीपदाचा कारभार त्यांच्याकडेच द्यायला हवा मात्र सेनेला स्वतःकडे च ते पद ठेवायच असेल तर मात्र आदित्य ठाकरे किंवा एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री करावं असे प्रसाद लाड यांनी म्हंटल.

मुख्यमंत्री बरे होण्यापर्यंत आदित्य ठाकरे यांच्याकडे तो चार्ज देण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं. पण तोपर्यंत त्यांनी कुणाकडे तरी चार्ज द्यावा. हवं तर आदित्य ठाकरे यांच्याकडे चार्ज द्या, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Comment