हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय पातळीवर किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. गुरुवारी, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 82 रुपयांची वाढ झाली आहे तसेच एक किलो चांदीच्या किंमतीत 1,074 रुपयांची वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे याबाबत म्हणणे आहे की, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत पॅकेजबाबत केलेल्या ट्विटनंतर सोन्याच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाली आहे. मात्र, तज्ञांचे असेही म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमती त्याच्या विक्रमी पातळीवरून घसरून 50,000 रुपयांवर आल्या आहेत. आगामी काळात ते स्थिर राहू शकतील. दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ किंवा घसरण होण्याची शक्यता नाही. दिवाळीतही सोनं प्रति 10 ग्रॅम 50000-52000 च्या श्रेणीत राहू शकते.
सोन्याचे नवीन दर
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते दिल्लीत 99.9% शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 82 रुपयांनी वाढून 51,153 रुपये झाली आहे. बुधवारीच्या अखेरच्या सत्रात म्हणजेच व्यापार संपल्यानंतर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 51,071 रुपयांवर बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1891 डॉलरवर बंद झाला.
आता पुढे काय होईल?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत पॅकेजवर सही करण्याच्या विषयाबद्दल ट्विट केले. यानंतर जगभरातील शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. कारण, अमेरिका ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. तेथे जर गोष्टी सुधारल्या तर संपूर्ण जगाला त्याचा फायदा होईल. म्हणूनच गुंतवणूकदारांच्या सोन्याकडे कल कमी झाला आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाल्यावर सोन्याच्या किंमती वाढतात. जेव्हा सरकार अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्यासाठी कोणतेही पाऊल उचलते तेव्हा सोन्याचे दर मऊ होतात.
चांदीचे नवीन दर
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतींमध्येही वाढ दिसून आली आहे. गुरुवारी एक किलो चांदीची किंमत 1,074 रुपयांनी वाढून 62,159 रुपये प्रति किलो झाली आहे. त्याच बरोबर, चांदीच्या त्या आधीच्या एक दिवस आधी बुधवारी प्रतिकिलो 61,085 रुपयांवर बंद झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.