हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : गेल्या आठवड्यात सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरीत्या घसरण झाली. या आठवड्यात सोन्याच्या भावात 1522 रुपयांची मोठी घसरण पहायला मिळाली. त्याचवेळी चांदीचा भाव देखील 793 रुपयांनी घसरला आहे. IBJA च्या वेबसाइट वरील माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (12 ते 16 सप्टेंबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 50,863 होता, जो शुक्रवारपर्यंत 49,341 रुपये प्रति 10 वर आला आहे. तसेच गेल्या आठवड्यात चांदीचा भाव 55,937 रुपयांवरून 55,144 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की, IBGA कडून जाहीर करण्यात किंमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. Iतसेच या किंमती देशभरात सार्वत्रिक आहेत मात्र त्यामध्ये GST चा समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याच्या किंमती
12 सप्टेंबर 2022- 50,863 रुपये प्रति 10 ग्रॅम
13 सप्टेंबर 2022- 50,676 रुपये प्रति 10 ग्रॅम
14 सप्टेंबर 2022- 50,300 रुपये प्रति 10 ग्रॅम
15 सप्टेंबर 2022- 49,926 रुपये प्रति 10 ग्रॅम
16 सप्टेंबर 2022- 49,341 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीच्या किंमती
12 सप्टेंबर 2022- रुपये 55,937 प्रति किलो
13 सप्टेंबर 2022- रुपये 57,270 प्रति किलो
14 सप्टेंबर 2022- रुपये 56,350 प्रति किलो
15 सप्टेंबर 2022- रुपये 56,330 प्रति किलो
16 सप्टेंबर 2022- रुपये 55,144 प्रति किलो
सोन्याच्या साठ्यामध्ये वाढ
9 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्यामध्ये 34 कोटी डॉलर्सने वाढ होऊन 38.64 अब्ज डॉलर्स झाला. यापूर्वी, 2 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 38.303 अब्ज डॉलर्स इतका होता. त्याचवेळी त्यात $1.339 अब्जची घट झाली. Gold Price
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.ibja.co/
हे पण वाचा :
Google Pay वर अशा प्रकारे तयार करा एकापेक्षा जास्त UPI आयडी !!!
Investment : ELSS की PPF यापैकी कोणती योजना जास्त फायदेशीर आहे ??? तज्ञांकडून जाणून घ्या
ICICI Bank ने गुंतवणूकदारांना केले मालामाल !!! 23 वर्षात दिला 220 पट रिटर्न
फक्त 50 हजार रुपयांत परदेश प्रवासाची संधी !!! IRCTC कडून स्वस्त हवाई टूर पॅकेज लाँच
Gold Price Today : सोने- चांदीच्या किंमतीत घसरण; पहा नवे दर