हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील वायदे बाजारात आज चांदीच्या किमतीत चांगलीच वाढ दिसून आली, त्यामुळे चांदीचा देशातील वायद्याचा दर हा विक्रमी उच्चांकावर पोहोचला. एमसीएक्स एक्सचेंजवर सकाळी 9:00 वाजता 14 सप्टेंबर 2020 रोजीचा चांदीचा भाव हा 55,423 रुपये प्रतिकिलो होता.
या काळात चांदीचा भाव 1,418 रुपयांनी वाढला, त्यानंतर चांदीचा वायदा दर हा विक्रमी पातळीवर पोहोचला. चांदीबरोबरच सोन्याच्या देशांतर्गत वायदाच्या किंमतीही वाढल्या आहेत. 5 ऑगस्ट 2020 रोजीच्या एमसीएक्सवरील सोन्याचा वायदा मंगळवारी सकाळी प्रति दहा ग्रॅम 49,100 रुपयांवर होते. यावेळी सोन्याच्या वायद्यात 73 रुपयांची वाढ झाली. त्याचवेळी 5 ऑक्टोबर 2020 रोजीच्या वायद्याच्या सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 49,235 रुपयांवर होती. यावेळी सोन्याच्या वायद्यात 77 रुपयांची वाढ दिसून आली.
याखेरीज आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या किमतींमध्येही वाढ दिसून आली. मंगळवारी सकाळी कॉमेक्सवरील सोन्याच्या किंमतीत 0.16 टक्क्यांनी वाढ झाली. त्यावेळी सोन्याचा भाव हा प्रति औंस 1,820.30 डॉलर होता.
इतकेच नव्हे तर सोन्याचे जागतिक स्पॉट मार्केट 0.93 डॉलरच्या वाढीसह प्रति औंस 1,818.70 डॉलरवर व्यापार करीत आहे. जागतिक बाजारातील चांदीच्या किंमतीतही वाढ दिसून आली. कॉमेक्सवरील चांदीची किंमत ही 0.49 डॉलरने वाढून 20.70 डॉलर प्रति औंस झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.