हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : 22 ऑगस्ट रोजी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. आज MCX वर ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच दोन्ही धातूंचे भाव घसरले. सकाळी 10.45 पर्यंत सोन्यामध्ये 162 रुपयांनी तर चांदीमध्ये 452 रुपयांनी घसरण झाली.
सोन्याचा भाव सध्या केवळ 52 हजार रुपयांच्या खाली आहे. 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या फ्युचर्सची किंमत आज सलग पाचव्या सत्रात 0.31 टक्क्यांनी घसरून 51317 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आली आहे. ही एका महिन्यातील नीचांकी पातळी आहे. सोमवारी चांदीच्या दरातही घसरण आहे. बातमी लिहेपर्यंत MCX वर चांदीचा भाव 452 रुपयांनी घसरून 55,044 रुपये प्रति किलो झाला आहे. तत्पूर्वी, चांदीचा व्यवहार 55,237 रुपयांच्या पातळीवर सुरू झाला. परंतु काही काळानंतर मागील बंद किमतीपेक्षा 0.81 टक्क्यांनी घसरून ट्रेड सुरू केला. Gold Price Today
जागतिक बाजारातही आज सोने रेड मार्कवर ट्रेड करत असले तरी चांदी मात्र तेजीत आहे. सोमवारी, यूएस मार्केटमध्ये सोन्याची स्पॉट प्राईस $ 1,743.14 प्रति औंस होती. चांदीची स्पॉट प्राईस आज 0.16 टक्क्यांनी वाढून 19.03 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,960 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,930 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,600 रुपये
पुणे – 47,630 रुपये
नागपूर – 47,630 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,930 रुपये
पुणे – 51,960 रुपये
नागपूर – 51,960 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4783.00 | Rs 4783.00 | 0 % |
8 GRAM | Rs 38264 | Rs 38264 | 0 % |
10 GRAM | Rs 47830 | Rs 47830 | 0 % |
100 GRAM | Rs 478300 | Rs 478300 | 0 % |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 5218.00 | Rs 5218.00 | 0 % |
8 GRAM | Rs 41744 | Rs 41744 | 0 % |
10 GRAM | Rs 52180 | Rs 52180 | 0 % |
100 GRAM | Rs 521800 | Rs 521800 | 0 % |
हे पण वाचा :
Card Payment : ATM, डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे ते समजून घ्या
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये दररोज 238 रुपयांची गुंतवणूक करून मॅच्युरिटीवर मिळवा 54 लाख रुपये !!!
Bank FD : आता ‘या’ 2 मोठ्या बँकांनी देखील FD वरील व्याजदरात केली वाढ !!!
Gold Price : गेला संपूर्ण आठवडा सराफा बाजाराची स्थिती कशी होती ??? जाणून घ्या
DBS Bank ने FD वरील व्याजदरात केली वाढ, असे असतील नवीन व्याजदर