हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या किंमतींत घसरण झाल्याचे दिसून येत आहे. ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून येतो आहे. MCX वर एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 348 रुपयांनी घसरून 55,880 रुपये प्रति 10 ग्रॅम तर मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 537 रुपयांनी घसरून 65,096 रुपये प्रति किलो झाली .
गेल्या ट्रेडिंग सत्रात, एप्रिलमधील सोन्याच्या फ्युचर्सची किंमत 56,228 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावली. तसेच मार्चमधील चांदीच्या फ्युचर्सची किंमत 65,633 रुपये प्रति किलोवर बंद झाली. Gold Price Today
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली आहे. सोन्याची स्पॉट प्राईस 8.32 डॉलर्सने घसरून 1,828.17 डॉलर प्रति औंसवर चांदीची स्पॉट प्राईस $ 0.15 ने घसरून $ 21.49 प्रति औंस ट्रेड करत आहे. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,800 रुपये
पुणे – 51,800 रुपये
नागपूर – 51,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 56,510 रुपये
पुणे – 56,510 रुपये
नागपूर – 56,510 रुपये
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
EPFO आता परदेशातही देणार मोफत उपचार-पेन्शनसारख्या अनेक सुविधा, याचा लाभ कसा घ्याव ते पहा
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Credit Card द्वारे ई-वॉलेटमध्ये पैसे लोड करण्याचे फायदे-तोटे समजून घ्या
PNB : आता ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिला धक्का, कर्जावरील व्याजदरात केली वाढ