हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price Today : आज गुरुवारी म्हणजेच 22 सप्टेंबर रोजी भारतीय फ्युचर्स मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये घसरण होताना दिसत आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असली तरी चांदी मात्र मजबूत झाली आहे. आज भारतात सोन्याचा भाव 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. आज सुरुवातीच्या ट्रेडिंगमध्ये MCX वर सोन्याची किंमत 0.21 टक्क्यांनी घसरली आहे. त्याचप्रमाणे चांदीवर कालच्या क्लोझिंग प्राईसपेक्षा 0.30 टक्के कमी बोली लावली जात आहे.
हे लक्षात घ्या कि, MCX वर गुरुवारी सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 105 रुपयांनी घसरून 49,338 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. आज, MCX मध्ये चांदीच्या किमतीतही मंदी आहे. गुरुवारी चांदीचा दर 172 रुपयांनी घसरून 57,126 रुपये किलो झाला आहे. Gold Price Today
गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली, तर चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोन्याच्या स्पॉट प्राईसमध्ये आज 0.32 टक्क्यांनी घसरण झाली आहे. त्याच वेळी, चांदीचा दर 0.51 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. सोन्याचा भाव आज प्रति औंस $1,660.95 वर गेला आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 19.39 डॉलर प्रति औंस झाली आहे. Gold Price Today
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,230 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,200 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,230 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात. Gold Price Today
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत. Gold Price Today
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,000 रुपये
पुणे – 46,030 रुपये
नागपूर – 46,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,200 रुपये
पुणे – 50,230 रुपये
नागपूर – 50,230 रुपये
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://hellomaharashtra.in/tag/gold-price-today/
PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price)
Gram | 22 Carat Gold Yesterday | 22 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4583.00 | Rs 4598.00 | 0.326 %⌃ |
8 GRAM | Rs 36664 | Rs 36784 | 0.326 %⌃ |
10 GRAM | Rs 45830 | Rs 45980 | 0.326 %⌃ |
100 GRAM | Rs 458300 | Rs 459800 | 0.326 %⌃ |
PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (Gold Price Today)
Gram | 24 Carat Gold Yesterday | 24 Carat Gold Today | Daily Price Change |
1 GRAM | Rs 4999.00 | Rs 5013.00 | 0.279 %⌃ |
8 GRAM | Rs 39992 | Rs 40104 | 0.279 %⌃ |
10 GRAM | Rs 49990 | Rs 50130 | 0.279 %⌃ |
100 GRAM | Rs 499900 | Rs 501300 | 0.279 %⌃ |
हे पण वाचा :
तुमचे Facebook अकाउंट दुसरंच कोणीतरी वापरतंय? असे करा चेक
SBI ग्राहकांना दिलासा, आता ‘या’ सेवांसाठी द्यावे लागणार नाहीत पैसे
WhatsApp च्या मदतीने अशा प्रकारे बदला आपला UPI पिन
Bank FD : PNB, BoB,SBI यापैकी कोणत्या बँकेच्या FD वर जास्त व्याज मिळत आहे ते पहा
SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या