हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कालच्या तुलनेत आज 19 एप्रिल 2023 रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Price Today) वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,450 रुपये आहे तर चांदीची किंमत 75,460 रुपये प्रति किलो आहे. सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम पहायला मिळत असतानाच लग्नसराईच्या या काळात सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच चाप बसत आहे. उत्पादन शुल्क, राज्यांचा कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती संपूर्ण भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 56,050 रुपये
पुणे – 56,050 रुपये
नागपूर – 56,050 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 61,150 रुपये
पुणे – 61,150 रुपये
नागपूर – 61,150 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल?-
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते-
सोन्याच्या दरात (Gold Price Today) पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.