हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन। आज सोमवार (Gold Price Today) 26 सप्टेंबर म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर दुसरीकडे चांदीच्या किमती मात्र घसरल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारामध्ये 0.08 टक्क्यांनी वाढली आहे. तर दुसरीकडे चांदी 1.05 टक्क्यांनी घसरली आहे.आज फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा व्यवहार 49,350 रुपयांपासून सुरू झाला. काही वेळाने त्याची किंमत 49,440 रुपयांवर पोहोचली. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
दुसरीकडे, मल्टी कमोडिटी (Gold Price Today) एक्सचेंजमध्ये चांदीच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. चांदीचा दर आज 591 रुपयांनी घसरून 55,642 रुपये प्रतिकिलो झाला. आज चांदी 55,800 वर व्यवहार करत आहे. काही काळानंतर हा भाव 55,537 रुपयांपर्यंत घसरला. यानंतर थोडी वाढ होऊन आता 55,642 रुपये आहे .
गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,230 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,200 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,030 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,230 रुपये
सोन्याची शुद्धता कशी तपासाल? (Gold Price Today)
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.
सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी (Gold Price Today) दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
हे पण वाचा :
Bank FD : आता या बँकेकडून FD वर मिळणार 7.70 टक्के व्याज, व्याज दर तपासा
Jio च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये वर्षभर अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा 24GB डेटा
Prepaid Plans : टेलिकॉम कंपन्यांच्या या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन्सविषयी जाणून घ्या
RBI कडून या बँकेचे लायसन्स रद्द, आता खातेदारांच्या पैशांचे काय होणार ???
Post Office च्या या बचत योजनेमध्ये मिळतोय 7 टक्क्यांहून जास्त रिटर्न