मुंबई | वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत (एप्रिल ते सप्टेंबर) सोन्याची आयात 57 टक्क्यांनी कमी होऊन 6.8 अब्ज डॉलरवर गेली आहे. कोरोना साथीमुले मागणी घटल्याने सोन्याची आयात कमी झाली आहे. चालू खात्यातील तूट-सीएडीवर (current account deficit -CAD )वर सोन्याच्या आयातीचा परिणाम होतो.
पहिल्या सहामाहीत 15.8 अब्ज डॉलर्सची सोन्याची आयात झाली आहे
गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशाने 15.8 अब्ज डॉलर्स किंवा1,10,259 कोटी रुपयांचे सोने आयात केले. यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या काळात चांदीची आयातही 63.4 टक्क्यांनी घसरून 73.35 करोड़ डॉलर्सवर आली आहे. सोन्याची आणि चांदीची आयात (Import) कमी झाल्याने देशातील चालू खात्यातील तूट कमी झाली आहे.
आयात आणि निर्यातीमधील फरकाला Current Account Deficit (CAD) म्हणतात. एप्रिल ते सप्टेंबरमध्ये CAD घसरून 23.44 अब्ज डॉलर्सवर गेली, जी मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत 88.92 अब्ज डॉलर्स होती.
भारत दरवर्षी 9 हजार टन सोन्याची आयात करतो
जगातील सर्व देश सोन्याची आयात करतात, त्या मोठ्या देशांमध्येही भारताचा समावेश आहे. भारत एका वर्षामध्ये सुमारे 800 ते 900 टन सोन्याची आयात करतो. ज्वेलरी उद्योगाची मागणी पूर्ण करण्यासाठी बहुतेक सोने आयात केले जाते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत रत्ने व दागिन्यांची निर्यात 55 टक्क्यांनी घटून 8.7 अब्ज डॉलरवर गेली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.