हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यूएस फेडरल रिझर्व ने व्याज दर न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमती तसेच शेअर बाजारावर देखील होत आहे. म्हणूनच परदेशी बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. घरगुती व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, सोन्याच्या किंमतींवरचा दबाव आजही कायम राहू शकतो. ते म्हणाले की, बुधवारी स्पॉट मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. मंगळवारी सोन्या-चांदीच्या भावात तेजीची नोंद झाली होती. मंगळवारी झालेल्या वाढीमुळे सोन्याचा भाव आज 53 हजार आणि चांदी 70 हजारांच्या पातळीवर कायम आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली सराफा बाजारात बुधवारी सोन्याची किंमत 137 रुपयांनी घसरून 53,030 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. मंगळवारी ते प्रति 10 ग्रॅम 53,167 रुपयांवर बंद झाले होते.
चांदीचे नवीन दर
चांदीही 517 रुपयांनी घसरून 70,553 रुपये प्रतिकिलोवर आली. मंगळवारी चांदीचा दर प्रति किलो 71,070 रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याचा भाव प्रति औंस 1,967.7 डॉलरवर होता तर चांदीचा भाव औंस 27.40 डॉलर होता.
दुसरीकडे, वायदा व्यापारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या आहेत. परदेशी बाजारातील संकेतांच्या मदतीने बुधवारी वायदा व्यापारात सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर डिलीव्हरीसाठी सोन्याचे भाव 153 किंवा 0.30 टक्क्यांनी वाढून 51,922 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
याचा व्यापार 10,814 लॉटमध्ये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा करार डिसेंबरमध्ये 33 रुपयांनी किंवा 0.05 टक्क्यांनी वाढून 69 ,000 रुपये प्रतिकिलोवर आला. त्याचा 17,130 लॉटमध्ये व्यापार झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.