हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सराफा बाजारात आज सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे तर चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाल्याचे दिसून आले. आजचा सोन्याचा १० ग्रॅमचा दर ४७,४५० इतका नोंदविण्यात आला तर १ किलोग्रॅम चांदीचा दर ४७५५० नोंदविण्यात आला.
२२ कॅरेट सोन्याचा दर बुधवारी ४६२०० इतका होता तो आज ४६,२५० झाला आहे. २२ कॅरेट सोन्यामध्ये एकूण ५० रुपयांची वाढ दिसून आली तर २४ कॅरेट सोन्यामध्ये आज ४० रु वाढ दिसून आली बुधवारी २४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,४१० इतकी होती ती आज ४७४५० झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात किंचित घसरण दिसून आली. बुधवारी १ किलोग्रॅम चांदीची किंमत ४७,६०० रु होती आज चांदीची किंमत ४७,५५० इतकी झाली आहे. चांदीत ५० रुपयांची घट दिसून आली.
बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, हैद्राबाद, मुंबई या शहरात २२ कॅरेट सोन्याचा दर अनुक्रमे ४४८६रु, ४५५१ रु, ४६२५ रु, ४५५१ रु, ४६१०रु प्रति ग्रॅम नोंदविण्यात आला तर २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर अनुक्रमे ४८९३ रु, ४९६५रु, ४७४५रु, ४९६५रु, ४७१०रु नोंदविण्यात आला. तर या सर्व शहरांमध्ये चांदीचा प्रति किलोग्रॅम ४७,५५० रु असा समान नोंदविण्यात आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”