हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनो विषाणूचा परिणाम आता भारतीय उद्योगांवर दिसू लागला आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, या प्राणघातक कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशातील जेम्स अँड ज्वेलरी व्यवसायाला फटका बसला आहे.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ज्वेलरी उद्योगाच्या मागणीत ७५ टक्क्यांनी घट झाली आहे. आता देशभरात फक्त २० ते २५ टक्के व्यवसाय होत आहे. ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष अनंत पद्मनाभन म्हणाले, दागिन्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या सातत्याने कमी होत आहे. भीतीच्या वातावरणात किरकोळ विक्रेते केवळ २०-२५ टक्के व्यवसाय करत आहेत.
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत या काळात सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र, करोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता अनेक लग्न समारंभ एक तर रद्द झाले आहेत किंवा पुढे ढकलण्यात आले आहेत. ज्याचा परिणाम सोन्याच्या दागिन्यांच्या व्यापारावर होताना दिसत आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.