मुंबई | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अशातच अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बिगबींची कोरोना चाचणी नेगिटिव्ह आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून लवकरच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यांची कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच कोरोना चाचणी व्यतिरिक्त अमिताभ यांची ब्लड टेस्ट आणि सीटी स्कॅनही करण्यात आलं होतं. त्यांचे इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आहेत.
सध्या अभिषेक बच्चन यांचीही प्रकृती स्थिर असून अमिताभ आणि अभिषेक दोघांनाही एकाच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.अमिताभ यांच्या वयानुसार आणि त्यांना असलेल्या आरोग्याच्या इतर समस्या लक्षात घेऊन डॉक्टर्स त्यांची कोरोना ट्रिटमेंट करत होते. तसेच देशभरातील चाहत्यांकडूनही अमिताभ यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यात येत होती.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.
ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in