हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सोनेबाजारात सोन्याची किंमत उच्चतम पातळीवर पोहोचली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली होती. मात्र आज सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तसेच चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे दिसून आले आहे.
सोमवारीदेखील सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली होती. बुधवारी चांदीच्या दरातही उच्चतम पातळीवर वाढ झाली होती. मात्र आज अचानक सोने आणि चांदी दोन्हींच्या किमतीत घसरण झाली आहे. सोन्याच्या किंमतीत ३९६ रु प्रति १० ग्रॅम इतकी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर ४८४९०रु प्रति १० ग्रॅम इतका होता. बुधवारी हा दर ४८९८२रु प्रति १० ग्रॅम इतका होता.
२३ कॅरेट सोन्याचा आजचा दर ३९४रुपयांनी घसरला आहे. आजचा दर ४८२९६रु प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ३६३६ रुपयांनी घसरून ४४४१७ रु प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर ३६३६८रु प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरातही ८१२ रुपयांची घट झाली आहे. चांदीचा आजचा दर ४८६००रु प्रति किलो झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.