हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या पीक विमा योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात सुमारे १४,००० कोटी रुपयांचे पीक विमा दावे नोंदवले गेले आहेत, त्यापैकी आतापर्यंत फक्त ९,००० कोटी रुपयांच्या दावे हे निकाली काढले गेलेले आहेत. एका मीडिया रिपोर्टनुसार सर्वाधिक पीक विमा दावे हे हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात निकाली काढण्यात आले आहेत, जिथे जवळपास सर्वच दावे निकाली काढण्यात आलेले आहेत. याआधी पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी सक्तीची करण्यात आलेली होती, परंतु आता ती ऐच्छिक करण्यात आली आहे. आता जर शेतकरी विमा प्रीमियम बँकेत जमा करतील तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळेल अन्यथा नाही.
रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे
जर तुम्हालाही या पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खरीप पिकांच्या विम्यासाठीची शेवटची तारीख ही ३१ जुलै २०२० आहे. ज्या कर्जदार शेतकऱ्यांना ही विमा सुविधा नको असेल त्यांनी या योजनेच्या शेवटच्या तारखेच्या ७ दिवस आधीच त्यांच्या बँक शाखेला लेखी स्वरूपात कळवावे. कर्ज नसलेले शेतकरी हा विमा स्वत:देखील सीएससी, बँक, एजंट किंवा विमा पोर्टलवरून थेट घेऊ शकतात.
योजनेत केला हा मोठा बदल
या वर्षापासून शेतकऱ्यांसाठी ही पंतप्रधान पीक विमा योजना ऐच्छिक करण्यात आलेली आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाले तर याआधी ज्यांनी कर्ज घेतले आहे त्यांच्यासाठी देखील हा विमा घेणे सक्तीचे करण्यात आलेले होते, मात्र आता ते ऐच्छिक आहे. सर्व शेतकऱ्यांना आपल्या पीक विम्यासाठी बँकेत अर्ज करावा लागेल. जो शेतकरी बँकेत जाऊन पीक विम्याचा पर्याय निवडेल त्याचा विमा प्रीमियम वजा केला जाईल.
तसेच त्याला या पीक विम्याचा लाभही मिळेल. या विमा योजनेत पूर्वीप्रमाणे सर्व केसीसी धारकांना पीक विमा घेता येणार नाही तसेच त्यांचे प्रीमियमही कट केले जाणार नाहीत. येत्या खरीपासाठी पीक विमा प्रीमियम सादर करण्याची शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै ही अंतिम तारीख आहे.
PMFBY मध्ये कसा फायदा मिळेल
पेरणीच्या १० दिवसांच्या आत, शेतकऱ्याला PMFBYचा अर्ज भरावा लागेल. तसेच जर नैसर्गिक आपत्तीमुळे तुमचे पीक खराब झाले असेल तरच या विम्याच्या रक्कमेचा लाभ देण्यात येईल. पेरणी आणि काढणी दरम्यान उभ्या पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोग आणि कीटकांकडून नुकसान झाले तर या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळते. उभ्या पिकांना स्थानिक आपत्ती, गारपीट, दरड कोसळणे, ढगफुटी, आकाशीय विजेमुळे होणारी हानी यांमुळे होणाऱ्या नुकसानीची देखील भरपाई मिळते. पीक काढणीनंतर १४ दिवस शेतात वाळववण्यासाठी ठेवलेल्या पिकांची अवकाळी, चक्रीवादळ, गारपिट आणि वादळामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई देखील विमा कंपनी तुम्हांला देईल. प्रतिकूल हंगामी परिस्थितीमुळे पिकाची पेरणी झाली नाही तरीही याचा फायदा दिला जाईल.
प्रीमियम किती भरावा लागेल
खरीप पिकासाठी प्रत्येकी २% प्रीमियम आणि रब्बी पिकासाठी १.५% प्रीमियम भरावा लागतो. पीएमएफबीवाय योजना व्यावसायिक आणि बागायती पिकांसाठी विमा संरक्षण देखील प्रदान करते. यात शेतकऱ्यांना ५% प्रीमियम भरावा लागतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या डॉक्यूमेंटची आवश्यकट असते
यासाठी शेतकर्याचा फोटो, ओळखपत्र, रहिवासी पुरावा, शेती क्रमांक, शेतातील पिकाचा पुरावा द्यावा लागतो.
या दाव्यासाठी शेतकरी विमा कंपनीच्या टोल-फ्री नंबर १८००२००५१४२ किंवा १८००१२०९०९०९० वर किंवा विमा कंपनी तसेच कृषी विभाग तज्ञाशी संपर्क साधू शकतात. यासाठी ७२ तासांचा कालावधी निश्चित केला गेलेला आहे. नुकसान झाल्यास, शेतीनिहाय नुकसानीचे मूल्यांकन करून पैसे दिले जातात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.