IDBI ग्राहकांसाठी चांगली बातमी ! रिझर्व्हने 4 वर्षांनंतर उठविली बँकेवरील बंदी, यासाठी कोणत्या अटी घातल्या आहेत ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) चार वर्षानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) वरील बंदी हटविली आहे. तथापि, RBI ने IDBI बँकेसमोर काही अटी देखील ठेवल्या आहेत. यासह, आयडीबीआय बँक प्रॉम्प्ट करेक्टिव्ह एक्शन फ्रेमवर्क (PCA Framework) मधून वगळले गेले आहे, परंतु या बँकेचे सातत्याने निरीक्षण केले जाईल. RBI ने म्हटले आहे की, आयडीबीआयची कामगिरी लक्षात घेता त्यांच्या बोर्ड ऑफ फायनान्शिअल सुपरव्हिजन (BFS) पीसीएच्या चौकटीतून वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

IDBI बँकेने RBI ला लेखी आश्वासन दिले
गुंतवणूकदार आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी RBI असुरक्षित बँकांना पीसीएच्या चौकटीत ठेवते जेणेकरुन बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थेट कारवाई करता येईल. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की,”आयडीबीआयने कोणत्याही पीसीए मानकांचे उल्लंघन केलेले नाही. यामध्ये रेग्‍युलेटरी कॅपिटल, शुद्ध नॉन-परफॉर्मिंग ऐसट्स (Net NPA) आणि लिव्हरेज रेशयो (Leverage ratio) यासारख्या मानकांचा समावेश आहे.” केंद्रीय बँकेने सांगितले की,”आयडीबीआयने लेखी आश्वासन दिले आहे की, ते किमान रेग्‍युलेटरी कॅपिटल कायम ठेवतील आणि NPA वाढू देणार नाहीत. त्याच वेळी बँक स्ट्रक्चरल आणि सिस्टिमॅटिक सुधारणाही करेल. म्हणूनच त्यांना पीसीएच्या बाहेर काढले गेले आहे.”

आयडीबीआय 4 मध्ये कोणता निकष पूर्ण होऊ शकला नाही
पीसीएमधून बाहेर पडण्यासाठी आयडीबीआयने 4 पैकी 3 निकष पूर्ण केले आहेत. तथापि, एक निकष पूर्ण करण्यात बँक अपयशी ठरली आहे. आयडीबीआयने सलग 5 तिमाहींसाठी आपली नेट एनपीए 6 टक्क्यांपेक्षा कमी ठेवला आहे. तसेच, कॅपिटल अ‍ॅडव्हान्स रेश्यो (CAR) सलग 5 तिमाहीत रिझर्व्ह बँकेने ठरवलेल्या 11.5 टक्क्यांच्या वर राहिला. त्याच वेळी, बँकेचा लिव्हरेज रेशयो 5.71 टक्के होता, जो केंद्रीय बँकेच्या निश्चित 4 टक्क्यांहून अधिक होता. बँक वर्षभर केवळ पॉझिटिव्ह रिटर्न ऑन ऐसेट्स (ROA) रेशयो पूर्ण करू शकली नाही. तथापि, मागील 3 तिमाहीत बँकेचा ROA सकारात्मक होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment