पुणेकरांसाठी गुडन्युज! ससूनमधील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । Covid -१९ च्या उपचारासाठी कोणतेच खात्रीशीर औषध अद्याप सापडलेले नाही. शास्त्रज्ञ ते शोधण्यात व्यस्त आहेत. विविध उपचार पद्धती प्रायोगिक पातळीवर केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून Convalescent plasma (kon-vuh-LES-unt PLAZ-muh)  थेरपी वापरून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याच्या चर्चा सुरु आहेत. पुण्यात ससून रुग्णालयात १० व ११ मे या दिवशी उच्च रक्तदाब असलेल्या अतिस्थूल व्यक्तीवर ही थेरपी करण्यात आली होती. आज ती व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. त्या व्यक्तीला covid  वॉर्ड मधून हलविण्यात आले आहे. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंट वरून दिली आहे.

जे रुग्ण कोरोना मधून बरे झाले आहेत त्यांच्या शरीरात अँटीबॉडी, प्रोटीन असतात. ज्याचा वापर रक्त  या संसर्गाशी लढण्यासाठी करत असते. जे यातून बरे झाले आहेत अशा लोकांच्या रक्ताला  Convalescent plasma म्हणतात. प्लाझ्मा हा रक्ताचा द्रव भाग असतो. त्यामुळे संशोधकांना अशी आशा आहे की बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाची कोरोनाशी लढण्याची शक्ती वाढेल. कदाचित आधीच आजारी असणाऱ्या व्यक्तीला आणखी आजारी होण्यापासूनही वाचवेल. उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या लोकांची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने कमी असते. त्यामुळे अशा रुग्णांना बरे करणे अवघड असते. अशा रुग्णांना बऱ्या झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा दिल्यास ती व्यक्ती बरी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान बऱ्याच ठिकाणी या थेरपीचा उपचारासाठी वापर करण्याच्या चर्चा आहेत. ससूनमधील  या यशस्वी प्रयोगामुळे आता उपचारासाठी सकारात्मकता  निर्माण झाली आहे. आता मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होण्याची शक्यता आहे. तसेच गंभीर असणाऱ्या रुग्णांवरही उपचार करता येणार असल्याने मृत्यूचा धोकाही टाळता येणार आहे. प्लाझ्मा थेरपीची यशस्वी चाचणी ही सकारात्मक आशा आहे.

Pune

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment